रश्मी पुराणिक, मुंबई
मुंबई: महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन मोठा गदारोळ माजला आहे. विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत, तर सत्ताधारीही याचं खापर महाविकास आघाडीच्या माथ्यावर फोडताना दिसत आहेत. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, आम्ही दोन्ही राज्ये भाऊ आहोत. सर्व राज्यांमध्ये हेल्दी स्पर्धा आहे असं वक्तव्य करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. यावर आता शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. इथला प्रकल्प पळवला, मग महाराष्ट्र काय पाकिस्तान होता का? अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. (Aditya Thackeray Latest News)
फडणवीसांवर टीका करताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, एकत्र दिल्लीला जाऊ बोलले असते तर कौतुक केलं असतं, पण हे आरोप करत आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर चौकशी कोणाची करणार? केंद्राची की अनिल अग्रवाल यांची, की आत्ताच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची? सभागृहात का सांगितल गुंतवणूक येते म्हणून? असे अनेक सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दारी केली ती का? हे मी विचारत आहे. प्रश्न विचारणे चूक आहे का? एअरबस टाटा प्रकल्प यावा म्हणून आम्ही प्रयत्न केले होते, आता या सरकारने प्रयत्न करावे असं आव्हान आदित्य ठाकरेंनी केलं आहे. तसेच सरकार पडल्यावर एक महिन्यात प्रकल्प खेचला, पण मग आपल्या इथे तरुणांनी काय चूक केली? महाराष्ट्र पाकिस्तान होता का? इथला प्रकल्प पळवून का नेला? असे अनेक खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.