Manasvi Choudhary
आयब्रो हे चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतात यासाठी आयब्रो शेप योग्य निवडणे आणि ते नीट स्टाईलमध्ये असणे महत्वाचे आहे.
चेहऱ्याच्या आकारानुसार आयब्रोच्या देखील अनेक स्टाईल आहेत. आयब्रोच्या स्टाईल आज आपण पाहूया.
फेदर ब्राउज आयब्रो हा सध्याचा सर्वात मोठा ट्रेंड आहे. यात नैसर्गिक केसांना वरच्या बाजूला विंचरून 'फ्लफी' लूक दिला जातो.
स्ट्रेट किंवा लिफ्टेड ब्राउज कमानीऐवजी आयब्रोज सरळ ठेवले जातात. यामुळे डोळे मोठे आणि 'कॅट-आय' सारखे म्हणजेच थोडे खालच्या बाजूला झुकलेले दिसतात.
ज्यांना जास्त आयब्रो काढायला आवडत नाही ते क्लासिक शेप देऊ शकता ज्यात नैसर्गिक वळणमध्ये आयब्रो ठेवले जातात.
लेमिनेटेड आयब्रोज यात खूप चकचकीत, सरळ आणि जागी स्थिर दिसतात. हे प्रोफेशनल लूकसाठी उत्तम आहे.
सॉफ्ट राउंड आयब्रो यात कपाळ मोठे असल्यामुळे, नाजूक गोलाकार आयब्रोज लक्ष कपाळावरून काढून चेहऱ्याच्या खालच्या भागाकडे नेतात.