Jitendra Awhad Jeep Attacked near Thane SAAM TV
मुंबई/पुणे

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड गाडी हल्ला प्रकरण: नवी मुंबईमधून १ जण ताब्यात; स्वराज्य संघटनेच्या सरचिटणीसासह दोघांचा शोध सुरु

Gangappa Pujari

सचिन गाड| मुंबई, ता. २ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर काल हल्ला करण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांची गाडी फोडली. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून एक जणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विशाळगडावरील हिंसाचारावरुन जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला होता. विशाळगडावरील हिंसाचार हा संभाजीराजेंमुळेच झाला, असा आरोप त्यांनी केला होता. यावरुनच स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला.

आमदार जितेंद्र आव्हाड हे गाडीमधून ठाण्याकडे येत असतानाच पी डिमेलो रोडवर त्यांच्या गाडीवर हल्ला करत तोडफोड करण्यात आली. या हल्ला प्रकरणी आता महत्वाची अपडेट समोर आली असून डोंगरी पोलिसांनी नवी मुंबईमधून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि अंकुश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न करणे, गुन्हेगारी कट रचणे आणि दंगल माजवण्याचे आरोपांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT