Amol Kolhe/ Sanjay raut Saam TV
मुंबई/पुणे

अमोल कोल्हेंचा संजय राऊतांवर पलटवार म्हणाले; खासदार मतदार संघात नव्हे तर...

'नेता उमेदवार देऊ शकतो. पण त्या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व कुन्ही करावं हे फक्त जनताच ठरवते.'

रोहिदास गाडगे

पुणे : खासदार हा मतदार संघात नाही तर संसदेत दिसायला हवा आणि त्या खासदाराचे काम मतदार संघात दिसले पाहिजे आणि माझे काम मतदार संघात जनतेला दिसतंय असं म्हणत शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे दार नाही तर ते दार, ते दार नाही तर पलीकडचं दार आपण कुठं ही जाऊ, पण शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) संसदेत जाणारच, शिवाजी आढळराव पाटील हे 24 बाय 7 ऍक्टिव्ह असतात. पण शिरूरचे खासदार कधी दिसतात का तुम्हाला असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काल आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शिवसेना कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात केली होती.

शिवाय आता महाविकास आघाडी असल्याने मला काही पथ्य, बंधनं पाळावी लागतायेत. जी माझ्या तत्वात बसत नाहीत, नाहीतर हा राऊत गप बसला असता का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला होता. राऊतांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादीचे (NCP) खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे.

हे देखील पाहा -

नेता उमेदवार देऊ शकतो. पण त्या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व कुन्ही करावं हे फक्त जनताच ठरवते आणि जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्याचे सांगत, खासदार हा मतदार संघात नाही तर संसदेत दिसायला हवा आणि त्या खासदाराचे काम मतदार संघात दिसले पाहिजे आणि माझे काम मतदार संघात जनतेला दिसतय असं म्हणत शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंनी संजय राऊतांना टाला लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT