ajit pawar  saam tv
मुंबई/पुणे

मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून अजित पवारांनी शिंदे सरकारला सुनावलं; म्हणाले, 'तुम्ही दोघांनी...

'तुम्ही दोघांनी मंत्री व्हायचं, पण बाकीच्यांना प्रतिनिधीत्व द्यायचं नाही. तिथं अधिकार सचिवांना द्यायचा. तुमच्यामुळे लोकशाही ढासळली आहे. तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे, अशा शब्दात अजित पवारांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होऊन ३७ दिवस झाले आहेत. तरीही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत राज्यातील जनतेचे संबंधित कामे थांबू नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या या संबंधित विभागांच्या सचिवांकडे सोपावल्या आहेत, यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे सरकरवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Ajit Pawar News )

'तुम्ही दोघांनी मंत्री व्हायचं, पण बाकीच्यांना प्रतिनिधीत्व द्यायचं नाही. तिथं अधिकार सचिवांना द्यायचा. तुमच्यामुळे लोकशाही ढासळली आहे. तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे, अशा शब्दात अजित पवारांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थितीत 'निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा' हा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. अजित पवार म्हणाले, 'मावळात २ तारखेला लहान मुलीवर अत्याचार झाला आहे. आरोपींना अटक केली आहे. सदर प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे.मी माहिती घेतली आहे. मी पीडित मुलीच्या घरी जाणार आहे. नराधमाला ८ दिवसांच्या आत फाशी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. हे सर्व घडताना सरकारमधलं लक्ष घालायला कोणी नाही'.

दरम्यान, या मेळाव्यात अजित पवारांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले, तुम्ही दोघांनी मंत्री व्हायचं. पण बाकीच्यांना प्रतिनिधीत्व द्यायचं नाही. तिथं अधिकार सचिवांना द्यायचा. तुमच्यामुळे लोकशाही ढासळली आहे. तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे. आता लोकांमधून मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ द्या. लोक आता गप्प आहे, संधी मिळाल्यानंतर कुठलं बटण दाबतील कळणार नाही. जनता कोणालाही उलथून टाकू शकते'. राज्यात मंत्र्याचे अधिकार सचिवांना देण्याच्या आदेशावरून अजित पवार म्हणाले, 'राज्याचे अधिकार मुख्य सचिवांना द्या. त्यानंतर बाजूला बसा. मंत्रिमंडळ लवकर-लवकर-लवकर असं चालत नाही. दिल्लीतला सिग्नल मिळत नाही ते सांगा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT