Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : पुन्हा हा विषय वाढवायचा नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजित पवार संतापले

प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी कुठेही अपशब्द वापरलेले नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत विधान केलं होतं. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते, असं अजित पवारांनी ठामपणे सांगितलं होतं. भाजपने त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना आज अजित पवार यांनी भाजपला चांगलचं सुनावलं आहे. पुणे दौऱ्यावर असतांना अजित पवार बोलत होते.

पुन्हा हा विषय वाढवायचा नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी कुठेही अपशब्द वापरलेले नाहीत. मात्र राज्यपालांविरोधात कोणी का बोलत नाही असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, हा विषय वाढवण्यात अर्थ नाही. आम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कारण नसताना हा वाद पेटवला जात आहे. मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवणारे ते कोण? माफी मागण्या इतका मी काय गुन्हा केलाय? किंवा अपशब्द वापरलाय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कारण नसताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात. हे बरोबर नाही. आम्हाला जी भूमिका मांडायची, ती आम्ही मांडू. जनतेला जी भूमिका पटेल, त्या भूमिकेचं जनता स्वागत करेल, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genelia Deshmukh Married Age: 'तुझे मेरी कसम' चित्रपटात भेट, ८ वर्षांनी केलं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी लग्न, कोण आहे ही अभिनेत्री

Maharashtra State Cooperative Bank : यंदाची दिवाळी होणार गोड, राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना 14 टक्के बोनस जाहीर | VIDEO

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते दाखल

Ration Card KYC: घरबसल्या करा रेशन कार्ड केवायसी; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'या' कंपनीची स्थापना, IAS अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT