Chhagan Bhujbal Saam Tv
मुंबई/पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाच्या बाकावर बसायला तयार; छगन भुजबळांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेच्या ४२ आमदारांनी बंड केल्याचे समोर आले आहे. या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले. आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर आरोप करत, बंड केलेल्या आमदारांनी २४ तासात आपली मागणी उद्धव ठाकरेंसमोर मांडावी विचार केला जाईल, असं सूचक विधान केले आहे. या विधानावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या विधानावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

संजय राऊत यांनी हे विधान करण्याअगोदर इतरांशी चर्चा करायला हवी होती. आम्हाला काय अडचणी असतील त्या सांगायला हव्या होत्या. शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी आवाहन केले आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांनी रहायचे का नाही, हा त्यांचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसायची सवय आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

विरोधी पक्षात बसणे हे आमच्यासाठी नवीन नाही. त्यांना जे काही करायचे आहे, ते त्यांनी शरद पवार यांना सांगावे हा सगळा संभ्रम दूर करावा. शिनसेना आमचा सहयोगी पक्ष आहे, आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांची भाजपसोबत जाण्याची कोणतीही मागणी नाही, असंही भुजबळ म्हणाले.

शिंदे गट उद्या राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचे पत्र देणार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट उद्या शुक्रवारी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार आहेत. या पत्रात ४२ आमदारांच्या सह्या असणार आहेत. आज आणखी काही आमदार येणार असल्याने त्यांच्या सऱ्ह्या घेऊन पत्र पाठवणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४२ आमदारांसह बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे गट उद्या राज्यपाल यांना पत्र देणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Facial : पार्लरला न जाता घरच्या घरीत करा हे ५ फेशियल, चेहरा दिसेल चमकदार आणि सुंदर

Municipal Elections Voting Live updates : जळगाव महानगरपालिकेत ११.३० वाजेपर्यंत १३,३९टक्के मतदान

Ilkal Saree Dress: पार्टी आणि समारंभासाठी खास इरकल साडीपासून तयार करा हे 7 सुंदर स्टाईलिश ड्रेस

Blue Ink Voting Sign: मतदानाच्या वेळी बोटाला निळी शाई का लावतात?

Bigg Boss Marathi 6 : गळा दाबला अन्...; बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीची झुंज, विशाल-ओमकार एकमेकांना भिडले, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT