Sharad Pawar News in Marathi, Sharad Pawar on OBC Census  Saam TV
मुंबई/पुणे

OBC जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही - शरद पवार

पाच वर्ष सत्ता असताना, देशात सरकार असताना तुम्ही झोपला होता का?; पवारांचा सवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : केंद्राने एकदा ओबीसींची जनगणना (Census of OBC) करावी, जनगणनेनुसार न्याय वाटणी व्हावी, इथे कोणी फुकट मागत नाही. जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. पवार आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) ओबीसी पदाधिकाऱ्यांचे मुंबईत राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. या वेळी ते बोलत होते. (State Level OBC Convention)

पवार म्हणाले 'समाजातील मोठा वर्ग हा ओबीसी आहे. त्यांना आधार द्यायची गरज आहे. तो सन्मानाने उभा राहत नाही तोपर्यंत त्यांना आधार द्यायची गरज आहे. अनेक लोक प्रश्न मांडतात नकी लोकसंख्या किती? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे केंद्राने एकदा ओबीसींची जनगणना करावी, जनगणनेनुसार न्याय वाटणी व्हावी. कोणी इथे फुकट मागत नाही, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जनगणना झाली पाहिजे सांगितलं. ओबीसी जनगणना ज्याच्या हातात देशाची सूत्र आहेत ते करतील असे वाटत नाही. आपल्याला एकत्र याव लागेल, रस्त्यावर आल्याशिवाय गत्यंतर नाही. (Sharad Pawar News in Marathi)

हे देखील पाहा -

ज्यांच्या हातात राज्य त्यांची मानसिकता वेगळी आहे. कारण अशी जनगणना झली तर समाजातील एकी प्रखर होईल, चुकीचं वातावरण निर्माण होईल असं समजत आहेत. मात्र, सत्य समोर आल तर चुकीचं वातावरण होईल?? वस्तुस्थिती समोर आली तर अस्वस्थता येईल? असा प्रश्ना उपस्थित करत ओबीसी जनगणना ही राष्ट्रवादीची मागणी असल्याचंही पवार म्हणाले.

बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी ही भूमिका घेतली आहे. आज भाजप (BJP) नेते सांगतात माजी मुख्यमंत्री सांगतात धोका दिला. पाच वर्ष सत्ता असताना, देशात सरकार असताना तुम्ही झोपला होता का? हे बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे खरे अंतकरणात मळमळ आहे. ह्या वर्गाला काही मिळेल आपल्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील हे मंजूर नाही. फक्त टीका करतात असही पवार यावेळी म्हणाले. या अधिवेशनाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ओबीसीचे राष्ट्रीय नेते मंत्री छगन भुजबळ, खा. सुप्रिया सुळे, मंत्री हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

SCROLL FOR NEXT