NCP Chief Sharad Pawar Withdraw Resignation who is sonia doohan national-president of NCP  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: शरद पवारांच्या मागे बसलेली ती तरुणी कोण? पहाटेच्या शपथविधीवेळी केलं होतं महत्वाचं काम

Sharad Pawar Resignation: शरद पवार पत्रकारपरिषद घेत असताना त्यांच्या मागे एक तरुणी बसलेली दिसली. ही तरुणी नेमकी आहे तरी कोण? अशी चर्चा सुरू राज्यभरात सुरू झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar Withdraw Resignation: दोन दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अखेर आपला राजीनामा मागे घेतला. आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचं पवारांनी पत्रकारपरिषदेत जाहीर केलं. (Breaking Marathi News)

त्यांच्या या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून स्वागत केलं जातं आहे. दरम्यान, शरद पवार पत्रकारपरिषद घेत असताना त्यांच्या मागे एक तरुणी बसलेली दिसली. ही तरुणी नेमकी आहे तरी कोण? अशी चर्चा सुरू राज्यभरात सुरू झाली आहे.

शरद पवारांच्या मागे बसलेली ती तरुणी कोण?

ही तरुणी दुसरी कुणी नसून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. सोनिया दुहान असं त्यांचं नाव असून त्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या देखील आहेत. सोनिया यांनी २०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीवेळी राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाचं काम केलं होतं. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार नॉट रिचेबल होते.  (Latest Marathi News)

यामध्ये आमदार दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील यांचा समावेश होता. नाट्यमय पद्धतीने भाजपाच्या गळाला लागलेल्या या आमदारांना परत आणण्याचं काम या २८ सोनियांनी केलं होतं. त्यांनी गुरुग्राममधल्या एका हॉटेलमधून सोनियांनी या आमदारांना परत आणलं होतं.

सोनिया यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना कसं परत आणलं होतं?

नॉट रिचेबल असलेल्या ४ आमदारांपैकी एका आमदाराने शरद पवारांना (Sharad Pawar) मेसेज केला होता. त्यांना दिल्लीतल्या कोणत्यातरी हॉटेलमध्ये कोंडून ठेवल्याचं या आमदाराने सांगितलं. त्यानंतर सोनिया आणि त्यांचा सहकारी धीरज शर्मा यांनी या आमदारांचं लोकेशन शोधलं. गुरुग्राममधल्या ओबेरॉय हॉटेलमध्ये हे आमदार असल्याचं त्यांना कळलं..

या हॉटेलमध्ये जेव्हा सोनिया आणि धीरज गेले, तेव्हा तिथे भाजपाचे १०० ते १५० कार्यकर्ते उपस्थित होते. ते सर्व परिस्थिीवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर हॉटेलच्या मागच्या दाराने, जिथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, अशा ठिकाणाहून या आमदारांना बाहेर काढण्यात आलं. आणि या आमदारांना शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आणण्यात आलं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT