Sharad Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar: एवढ्या मोठ्या देशाला कृषी मंत्री नाही; शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात

Aakrosh Morcha : शेतकरी आणि कांदा प्रश्नावरून शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु आहे.

Bharat Jadhav

Sharad Pawar In Aakrosh Morcha Pune:

राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहे. देशाला अन्न पुरवणारा शेतकरी आत्महत्या करत आहे. १० दिवसात २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु एवढ्या मोठ्या देशाला कृषी मंत्री नसल्याचं सांगत राष्ट्रवादी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते शेतकरी आक्रोश मोर्चात बोलत होते. (Latest News)

शेतकरी (farmer) आणि कांदा (Onion) प्रश्नावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर (Central government) हल्लाबोल केलाय. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली यात मोर्चात शेतकऱ्यांना संबोधित करताना केंद्र सरकार हल्लाबोल केला. दरम्यान राज्यात सुरू झालेला आक्रोश मोर्चा फक्त पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून त्याचा आवाज देशात पोहोचला असल्याचं शरद पवार म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्रावर टीकास्त्र सोडताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहे. मी काल अमरावतीत होतो. पहिली बातमी वाचायला मिळाली की दहा दिवसांत आजुबाजुच्या जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. आम्ही सत्तेवर होतो तेव्हा शेतकऱ्याने आत्महत्या केलीय हे कळाल्यावर तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंह आणि आम्ही त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो. तेव्हा कळाले की सावकारी पाशामळे त्याने आत्महत्या केली होती. हे समजल्यावर आम्ही दिल्लीला परत गेलो आणि ७२ हजार कोटींची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला.

हा कृषिप्रधान देश, पण याना शेतकऱ्यांशी काही पडलेले नाही. आज तीच स्थिती आहे. पण कोणी ढुंकून बघायला तयार नाही. कृषिप्रधान देश आहे पण देशाला कृषीमंत्री नाही. हा आक्रोश मोर्चा पुण्यापुरता सीमित राहिलेला नाही, त्याचा आवाज देशात गेलाय. त्यातून देशभरात जागृती घडत आहे. ही जागृती बदल घडवणारी ठरणार आहे. शिवछत्रपतींच्या कर्मभूमीतून हा बदल घडवण्याचा संकल्प आम्ही केलाय. तेव्हा तो घडणारच याची मला खात्री असल्याचं शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT