Sharad pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Sharad pawar : भूकंप झाल्याचे कळताच...'; शरद पवार यांनी सांगितली किल्लारी भूकंपाची आठवण

Sharad pawar News In pune: 'मला किल्लारीत भूकंप झाल्याचे कळताच तिकडे पोहोचलो. किल्लारी भूकंपावेळी सामाजिक संस्थांनी कशाची अपेक्षा न करता मदत केली. हे फक्त महाराष्ट्रात होऊ शकतं, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

Sharad Pawar News:

पुण्यात सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या 'अनुभवें आले' पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी किल्लारी भूकंपाची आठवण सांगितली. 'मला किल्लारीत भूकंप झाल्याचे कळताच तिकडे पोहोचलो. किल्लारी भूकंपावेळी सामाजिक संस्थांनी कशाची अपेक्षा न करता मदत केली. हे फक्त महाराष्ट्रात होऊ शकतं, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली. (Latest Marathi News)

पुण्यात प्रतापराव पवार यांच्या 'अनुभवें' आले' या पुस्तकाचे प्रकाशन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एस पी मंडळाचे अध्यक्ष एस के जैन यांच्या हस्ते झालं. त्यानंतर या कार्यक्रमात सकाळ समूह संपादक सम्राट फडणीस यांनी शरद पवार, प्रतापराव पवार आणि एस के जैन यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

...अन् लिखाणाबद्दल प्रेम वाढत गेले : शरद पवार

शरद पवार म्हणाले,'जैन प्रसिद्ध वकील बोलताना म्हणाले माझे वय ८५ आहे. पण कारण नसताना एक वर्ष वाढलं.माझं वय वाढल्याने माझ्या समोर बसलेले सगळे भावंड यांचं वय वाढतं'.

'मी ज्या क्षेत्रात आहे, त्यात बदल होत असतो'. केंद्र, राज्याची जबाबदारी मिळाली, त्यानंतर विरोधीपक्षात बसावं लागलं. विरोधी पक्षात बसण्यासारखं समाधान सत्तेत बसल्ल्यावरही मिळत नाही. राजकारणात नवनवीन अनुभव आले. त्यामुळे लिखाणाबद्दल प्रेम वाढत गेले'.

'मी व्हिएसआयचा ३८ वर्ष अध्यक्ष आहे. मला एवढे वर्ष मला बदलावं असं वाटलं नाही. कामाची बांधिलकी आहे. जगात बदल होत आहेत. सगळ्या गोष्टी घडत असतात. मी अनेक संस्थेत काम करतो. वेळ काढता येतो. टाइम मॅनेजमेंट हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, असे शरद पवारांनी सांगितलं.

'तुम्ही खेळाचा विषय काढला. मी कबड्डी आणि क्रिकेट या सर्व स्तरावरील अध्यक्ष होतो. ठराविक वेळ दिला आणि त्यात त्यांचं काम करण्यासाठी त्यांनाच सांगत होतो. मी क्रिकेट खेळाडू कधीच निवडले नाहीत, त्यासाठी त्यातील तज्ज्ञ लोकांना सांगत असतो, असे ते पुढे म्हणाले.

'आम्ही सगळेजण जर दिवाळीला बारामतीला येऊन राहीलंच पाहिजे. त्यावेळी सगळं कळतं, तेव्हा बोलणं होतं. सर्वाना सांगून ठेवलं आहे, असंही शरद पवारांनी पुढे सांगितलं.

शरद पवारांनी सांगितली किल्लारी भूकंपाची आठवण

'महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक लहान मोठ्या संस्था आहेत. अनेक जण जबाबदारी घ्यायला तयार असतात. किल्लारी भूकंप झाला. मला किल्लारीत भूकंप झाल्याचं कळलं, तेव्हा सकाळी ७ ला किल्लारीला होतो. त्यात ९ हजार लोकांचा मृत्यू झाला. ८० हजार घरे गेली. सामाजिक संस्थांनी कशाची अपेक्षा न करता मदत केली हे फक्त महाराष्ट्र होऊ शकतं, त्यावेळी लोकांना सांगावं लागलं की मदत पाठवू नका. सरकार असो आणि नसो... लोक उभे राहतात, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT