Pratap Pawar : 'आमचं कुटुंब टिकलं, कारण...'; प्रतापराव पवार यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

'आमचं कुटुंब टिकलं, त्यामागे आमची आई आहे. संस्था आणि कुटुंब असो वृत्ती तीच राहते. मी कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार यांना जबाबदारी सांगतो. त्यांच्यावर जबाबदारी असते, असं प्रतापराव पवार यांनी सांगितलं.
Pratap Pawar
Pratap PawarSaam tv

सचिन जाधव, पुणे

Pratap Pawar Latest News:

'आमचं कुटुंब टिकलं, त्यामागे आमची आई आहे. संस्था आणि कुटुंब असो वृत्ती तीच राहते. मी कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार यांना जबाबदारी सांगतो. त्यांच्यावर जबाबदारी असते, असं म्हणत सकाळ माध्यम समूह अध्यक्ष आणि शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. (Latest Marathi News)

पुण्यात सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. प्रतापराव पवार यांच्या 'अनुभवें आले' या पुस्तकाचे प्रकाशन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एस पी मंडळाचे अध्यक्ष एस के जैन यांच्या हस्ते झालं. त्यानंतर या कार्यक्रमात सकाळ समूह संपादक सम्राट फडणीस यांनी शरद पवार, प्रताप पवार आणि एस के जैन यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत प्रताप पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pratap Pawar
Gold Silver Rate (3rd February 2024): सोन्याचा भाव गडगडला, चांदीची चकाकीही उतरली; मुंबई-पुण्यातील आजचा दर किती?

या कार्यक्रमात प्रताप पवार म्हणाले, 'मला लिहायला लावणं संपादकांचं काम आहे. मी वाचकांकरिता लिहिन म्हणून मी प्रामाणिकपणे लिहित राहिलो. हे सर्व टीम वर्क होतं. त्यातून ही निर्मिती आहे. माझ्या दृष्टिकोनात संस्था फार मोठी असते. अनेक लोक मला भेटले, अनेकांचा मानवी चेहरा मला भावला. मला शंकरराव चव्हाण यांनी संधी दिली. किर्लोस्कर संस्थेमध्ये काम केलं. हा धागा कायमच राहिला. सगळ्या पीढीने सांभाळला आणि वाढवला. यात मी कॉमन राहिलो'.

'शरद पवारांवर कुटुंबाची जबाबदारी असते. त्यांचं लक्ष आहे. माझी बायबास झाली, तेव्हा दोन दिवस शरद पवार सोबत होते, असं प्रतापराव म्हणाले.

'आपण १५० देशातील शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती देतो. शेतीविषयीचं हे काम ऑक्सफर्ड विद्यापीठ करत आहे. त्यानंतर बारामती जगातील दुसरं ठिकाण आहे. जिकडे हा प्रयोग यशस्वी केला आहे. ही संस्था शरद पवारांनी उभारली आहे. त्यामुळे मी सगळं करू शकलो. मी जगभर फिरतो. माणसं वाचतो हे सगळं घडतंय, असंही त्यांनी सांगितलं.

Pratap Pawar
Paytm च्या पेमेंट बँकेचा परवाना होणार रद्द? RBI ॲक्शन मोडमध्ये, ग्राहकांवरही होणार परिणाम

आजूबाजूला कायम नैतिक भिंत उभी होते : प्रतापराव पवार

'मी शिकत गेलो, काम करत गेलो. लोकांच्या सहवासात आलो. अनेक लोकांच्या संपर्कत आलो. अनेक निस्वार्थी लोक भेटत गेले. माझ्या आजूबाजूला कायम नैतिक भिंत उभी होते. रोज काम करतो. त्याचा परिणाम होत असतो. त्यातून निस्वार्थी होणं, सगळ होत गेलं. मी भगवत गीता वाचली आहे. अध्यात्म आणि व्यवसाय याची सांगड घालू शकतो. समाजासाठी योगदान दिले तर स्वतःला पण वेळ द्यावा. वेगवेगळ्या संस्थेत वेगवेगळे अनुभव मिळत राहतात, असंही ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com