Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar : शरद पवार यांनी सांगितला भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा 'तो' किस्सा; म्हणाले...

भारत-पाकिस्तानच्या सामन्याचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

Rashmi Puranik

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत सुरू असलेल्या कोकण मेळाव्यास हजेरी लावली. या मेळाव्यात शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्याचबरोबर भारत-पाकिस्तानच्या सामन्याचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून परवानगी घेतल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. (Latest Marathi News)

मुंबईत सुरू असलेल्या कोकण मेळावा २०२३ सुरू आहे. बशीर एम हजवानि फाउंडेशन , कोकण कल्चर फाऊंडेशन आणि कोकणी कम्युनिटी फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळाव्याचा कार्यक्रम सुरू आहे मुंबई ,ठाणे , पालघर , रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा विविध ठिकाणाहून कोकणी माणूस या कोकण मेळाव्यात आले आहेत.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, 'मला दु:ख होते. आपल्या देशात वेग-वेगळ्या धर्म, भाषेचे लोक आहेत. त्यामुळे देशात बंधुत्व असलं पाहिजे. परंतु देशात धर्माच्या नावावर राजकारण करणारे लोक समाजात द्वेष पसरवत आहे'.

'मी एकदा एक गोष्ट बोललो तर माध्यमांनी माझ्यावर टीका केली. कराचीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) सामना होणार होता. परंतु भारत सरकारची टीम इंडियाला खेळण्यास परवानगी नव्हती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना तरुणांना खेळायला संधी द्या असे सांगितले. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी परवानगी दिली होती', असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

'खेळाडू तेव्हा मला बोलले. आम्हाला कराची बघायची आहे.अखेर कराचीला गेलो. आम्ही कराचीमध्ये न्याहारी करायला थांबलो. त्यावेळी हॉटेल मालकाने तुम्ही आमचे पाहुणे आहात, असे सांगत न्याहारीचे पैसे घेतले नाही. हॉटेल मालकाने सांगितले की, आम्ही टीव्हीवर पाहिले की, खेळाडून कराचीत आले आहे. आम्ही पाहुण्यांकडून पैसे घेत नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने पैसे घेतले नाही, असे शरद पवार पुढे म्हणाले.

'परदेशात क्रिकेट निमित्ताने पाकिस्तान-बांग्लादेश-श्रीलंकेत जायचो. तेव्हा पाकिस्तान-बांग्लादेशातील लोक भारतात येण्यास आग्रही होते. त्यांचे कोणी नातेवाईक भारतात होते. त्यांना भेटायला भारतात यायचं होतं. सामान्य लोकांमध्ये द्वेष नाही. राजकारणी लोकांमध्ये द्वेष आहे. मात्र, नागरिकांमध्ये द्वेष नाही. जगातील सगळे धर्म, भाषेचे लोक एकत्र आणले पाहिजे. बंधुता, एकता ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: ICU मध्ये बेड नाही, स्ट्रेचरवरच उपचार; कूपर रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये उन्हाचा चटका वाढताच रस्त्यावर शुकशुकाट

BJP: माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, तेव्हाच पद मिळेल; महिला पदाधिकाऱ्याचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, वाटेत दोघांनी अडवलं; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार

Auto Driver Marathi language : हिंदीसक्तीचा बदला घेण्यासाठी शिंदेसेनेची मराठीसक्ती? EXPLAINER

SCROLL FOR NEXT