Satyajeet Tambe PC : आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं गेलं- सत्यजीत तांबे

Satyajeet Tambe News: माझ्या कुटुंबाला आणि थोरात साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असे गंभीर आरोप सत्यजित तांबे यांनी केले
Satyajit Tambe broke his silence on decision to fight independent
Satyajit Tambe broke his silence on decision to fight independentsaam tv
Published On

Nashik News: आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं गेलं असा गंभीर आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित उमेदवार सत्यजित तांबे यांनी केला आहे. मी पक्षाकडे एबी फॉर्म मागितला पण मला आधी चुकीचे फॉर्म पाठवण्यात आले आणि नंतर शेवटच्या क्षणी माझ्या वडिलांच्या नावाचा फॉर्म पाठवण्यात आला.

हे सर्व मला बाहेर ढकलण्याचं एक पूर्वनियोजित षडयंत्र होतं, पूर्ण स्क्रीप्ट ठरलेली होती. हे सर्व करून माझ्या कुटुंबाला आणि थोरात साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न होता असे गंभीर आरोप सत्यजित तांबे यांनी केले आहे.

सत्यजित तांबे पत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, मी ९ तारखेला आम्ही एबी फॉर्म मागितला होता. त्यानंतर १० तारखेला माझा माणूस दिवसभर नागपूरला बसून राहिला.

Satyajit Tambe broke his silence on decision to fight independent
Satyajit Tambe : निवडून आल्यानंतर आता पुढे काय? सत्यजित तांबेंनी स्पष्टच सांगितलं

त्यानंतर तो प्रदेशाध्यक्षकडून २ सीलबंद एबी फॉर्म घेऊन घेऊन आला. मात्र ते दोन्ही एबी फॉर्म चुकीचे होते, ते नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नव्हतेच अशी माहिती तांबे यांनी दिली. त्यातील एक एबी फॉर्म हा औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचा होता, तर दुसरा नागपूर शिक्षक मतदार संघाचा होता.

प्रदेश कार्यालयाने आपली चूक का मान्य केली नाही, असा प्रश्न तांबे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मला अपक्ष निवडणूक लढवायची असती तर मी एबी फॉर्म का मागितला असता. मला चुकीचे फॉर्म मिळाले हे प्रदेश कार्यालयाला का कळवल असतं.

पुढे बोलताना सत्यजित तांबे यांनी सांगितले की, १२ तारखेला डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फॉर्म आला. माझी वडिलांच्या जागी लढण्याची अजिबात इच्छा नव्हती. मला स्वतंत्र मतदारसंघातून लढायचं होतं. परंतु माझा पक्षच माझ्या पाठीमागे उभा राहत नसल्याने माझे वडील पुढे आले आणि त्यांनी मला त्यांच्या जागेवर लढण्यास सांगितले. सुरुवातीपासून मी त्यांच्या जागेवर लढण्यासाठी तयार नव्हतो. मी फॉर्म देखील काँग्रेसच्या नावानेच भरला. परंतु एबी फॉर्म न मिळाल्याने तो अपक्ष ग्रहीत धरला गेला.

Satyajit Tambe broke his silence on decision to fight independent
Satyajeet Tambe : ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या भावासारखा मानतो; सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

माझ्या परिवाराला जाणीवपूर्वक बदनाम केलं गेलं. ही सर्व स्क्रीप्ट आधीच लिहिली गेली होती असे सत्यजित तांबे म्हणाले. पक्षाने उमेदवार कोण हे तांबे कुटुंबीयांवर सोपवले होते तर मग मी एबी फॉर्म मागितलेला असताना १२ तारखेला माझ्या वडिलांच्या नावे दिल्लीतून उमेदवारी का जाहीर करण्यात आली असा प्रश्न देखील तांबेंनी उपस्थित केला.

हा पूर्णपणे एका षड्यंत्रचा भाग होता, बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न होता. थोरात म्हणाले तू एचके पाटलांशी बोल. पण 12 तारखेला एच के पाटील आणि नाना पटोले यांनी माझे फोन उचलले नाही. मी फॉर्म भरताना काँग्रेसकडूनच फॉर्म भरला होता

मला भाजपकडे ढकलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. मी फॉर्म भरल्यानंतर एच के पाटील यांना म्हणालो मला काँग्रसचा पाठिंबा जाहीर करा. त्यानतंर काँग्रेसचया पाठिंब्यासाठी मला जाहीर माफी मागावी लागेल असं सांगण्यात आलं. मी त्यासाठी देखील तयार झालो. मी पत्र लिहिले त्याच्या २ तासांनी महाविकास आघडीचा दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर झाला.

Satyajit Tambe broke his silence on decision to fight independent
Satyajeet Tambe News : 'भाजपच्या पाठिंब्यानेच सत्यजित तांबे निवडून आले'

मी १६ की १७ तारखेला नाना पटोले यांना फोन केला की हे सोडून द्या आणि मला पाठिंबा द्या. पण वारंवार आमच्यावर फसवणुकीचे आरोप होत राहिले. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत. परंतु मला हा विषय इथेच संपवायचा आहे. मी यापुढे या विषयावर काहीही बोलणार नाही. ही माझी शेवटची पत्रकार परिषद आहे. आता मला लोकांसाठी काम करायचं आहे असे सत्यजित तांबे म्हणाले. तसेच त्यांनी मदत करणाऱ्या सर्व पक्षांच्या नेते आणि लोकांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com