Satyajit Tambe : निवडून आल्यानंतर आता पुढे काय? सत्यजित तांबेंनी स्पष्टच सांगितलं

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आज पत्रकारपरिषद घेत एक मोठी घोषणा केली आहे.
Chandrashekhar Bawankule On Satyajit Tambe
Chandrashekhar Bawankule On Satyajit Tambe Saam TV
Published On

Satyajit Tambe Latest News : विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आज पत्रकारपरिषद घेत एक मोठी घोषणा केली आहे. निवडून आल्यानंतर आता मी अपक्षच राहणार असून मला ज्या मतदारांनी निवडून दिले आहे. त्यांच्या विकासासाठी मी काम करणार असल्याचं सत्यजित तांबेंनी स्पष्ट केलं आहे.  (Latest Marathi News)

Chandrashekhar Bawankule On Satyajit Tambe
Satyajeet Tambe News : 'भाजपच्या पाठिंब्यानेच सत्यजित तांबे निवडून आले'

त्याचबरोबर तांबे यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप देखील केले. मला काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं काम सुरू आहे. मी युवक काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. मी असा कार्यकर्ता आहे की ज्याने ५० हून अधिक केस आपल्या अंगावर घेतल्या. मात्र, तरीदेखील पक्षाने माझी दखल घेतली नाही, मला डावलण्यात आलं, असा आरोपही सत्यजित तांबे यांनी काँग्रेसवर केला. (Maharashtra Political News)

त्याचबरोबर मी काँग्रेसकडूनच फॉर्म भरला होता, पण वेळेवर एबी फॉर्म मिळाला नसल्याने माझी उमेदवारी ही अपक्ष म्हणूनच झाली, असा गौप्यस्फोटही तांबे यांनी केला आहे.  पक्षात, संघटनेत मला संधी मिळावी, यासाठी मी वारंवार मागणी केली.

Chandrashekhar Bawankule On Satyajit Tambe
Satyajeet Tambe : ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या भावासारखा मानतो; सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

मात्र, मला संधी नाकारली. वडिलांच्या जागेवर तुम्ही निवडणूक लढवा, असं सांगण्यात आलं. अखेर आम्ही तो निर्णय घेतल्यानंतरही प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून दोन वेळा चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आले. त्यामुळेच ऐनवेळी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला, असं सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

पुढे बोलताना सत्यजित तांबे म्हणाले, माझ्या वडिलांच्या जागेवर जर मला निवडणूक लढवायची असती, तर मी २२ वर्षे संघटनेसाठी जे काम केलं, हा विचार वाढवण्याचं काम केलं. मला पक्षाने किंवा संघटनेनं काहीतरी द्यावं, अशी मानसिकता आहे, वडिलांच्या जागी निवडणूक लढवावी, अशी माझी मानसिकता नाही, हे मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं, पण दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही, तू वडिलांच्या जागी प्रयत्न कर, असा सल्ला ते मला देऊ लागले, याला माझा पूर्णपणे विरोध होता,” अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबेंनी मांडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com