Satyajeet Tambe
Satyajeet Tambesaam tv

Satyajeet Tambe News : 'भाजपच्या पाठिंब्यानेच सत्यजित तांबे निवडून आले'

सत्यजीत तांबे यांनी नुकताच नाशिक पदवीधर मतदारसंघात विजय मिळविला आहे.
Published on

- सचिन बनसाेडे

Satyajeet Tambe : भाजपच्या पाठिंब्यानेच नाशिक पदवधीर मतदारसंघात सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) निवडून आले आहेत. यात कोणताही संदेह नाही असे मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी स्पष्ट केले. तांबे यांनी काेणत्या पक्षात ज्यायचे हा निर्णय त्यांनी करायचा आहे असेही विखे-पाटील यांनी नमूद केले.

Satyajeet Tambe
Pandharpur : विठ्ठल भेटीनंतर Amit Thackeray पंढरपुरात स्पष्टच बाेलले, हे समीकरण आम्ही बदलणारच !

राधाकृष्ण विखे-पाटील यांना सत्यजीत तांबे हे भाजपात प्रवेश करीत असल्याची चर्चा आहे असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता विखे-पाटील यांनी त्याबाबत तांबे हे याेग्य ताे निर्णय घेतील असे म्हटले. विखे- पाटील म्हणाले भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने ते निवडून आले आहेत हे निर्विवाद सत्य आहे. (Maharashtra News)

Satyajeet Tambe
Shambhuraj Desai News : हे सहन केले जाणार नाही; शंभूराज देसाईंनी अजित पवारांना सुनावलं

कोण गप्प होत, कोण कुणाची यंत्रणा वापरत होत त्याला महत्व नाही. बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी सत्यजीतसाठी यंत्रणा उभी केल्याचे उत्तर एका प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. नाशिक पदवीधर मतदारसंघात बाकी काही उरलं नाही शत प्रतीशत भाजप आहे असेही विखे-पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com