Sharad Pawar News  Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar on Praful Patel: प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची वाट बघतोय, त्यांनी ईडीचा चॅप्टरही लिहावा; शरद पवारांचं प्रत्युत्तर

Sharad Pawar on Praful Patel: 'माझ्याकडं बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत, मी भविष्यात पुस्तक लिहिणार आहे, असं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. 'प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची वाट बघतोय, त्यांनी ईडीचा चॅप्टरही लिहावा, असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, पुणे

Sharad Pawar Latest News:

पुण्यात शरद पवार गटाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. 'माझ्याकडं बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत, मी भविष्यात पुस्तक लिहिणार आहे, असं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. 'प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची वाट बघतोय, त्यांनी ईडीचा चॅप्टरही लिहावा, असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं. (Latest Marathi News)

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत आजच्या बैठकीविषयी माहिती दिली. 'राज्यात काही भागात दुष्काळी परीस्थिती आहे. तर काही ठिकाणी अवकाळीने नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत करायला हवी. विधीमंडळात हा प्रश्न मांडला जाईल. यासाठी आजची बैठक होती, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवार काय म्हणाले?

'अजित पवारांनी राजकीय निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे. फक्त तक्रार एकच आहे की, त्यांना आता निर्णय घेण्याऐवजी निवडणुकीचा फॉर्म भरला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नावाने घेतला. अजित पवारांना देण्यात आलेलं तिकीट हे जयंत पाटील किंवा माझ्या सहीचं असेल. लोकांच्या समोर राष्ट्रवादीसाठी मते मागितले. त्यानंतर त्याच्याशी विसंगत भूमिका घेणे मला मान्य नाही, अशी भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केली.

पवारांनी प्रफुल्ल पटेलांना काय प्रत्युत्तर दिलं?

शरद पवार म्हणाले, '२००४ मध्ये भाजप बरोबर जाण्याची भूमिका प्रफुल्ल पटेल यांची होती. त्यांनी मला तासंतास समजवण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना सांगितले, तुम्हाला जायचं तर जा. त्यानंतर २००४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला. भाजपचे सरकारही आले नाही. तरीही पराभव झालेल्या प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद दिले, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी भविष्यात पुस्तक लिहून अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला होता. पटेल यांच्या दाव्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. 'मी प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची वाट बघतोय. त्यात त्यांनी ईडीचा चॅप्टर पण लिहावा. दिल्लीतील त्यांच्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतलं. ईडीने घराचे मजले ताब्यात का घेतले, तेही त्यांनी लिहावे, असंही पवार म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्याविषयी शरद पवार काय म्हणाले?

'एकनाथ खडसे कुठल्याही प्रकारचा संघर्ष करायला तयार असतात. त्यांना उद्या सांगितले की, निवडणुकीला उभे रहा. ते लगेच कामाला लागतील. पण मला पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांची प्रकृती विचारात घ्यावी लागेल. त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या उमेदवारीचा निर्णय घेऊ, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT