Sharad Pawar : शिवसेनेसोबत जाण्याची आमची भूमिका होती; शरद पवार यांनी अजित पवार यांचा दावा खोडून काढला...

Sharad Pawar On Ajit Pawar: शिवसेनेसोबत जाण्याची आमची भूमिका होती; शरद पवार यांनी अजित पवार यांचा दावा खोडून काढला
Sharad Pawar On Ajit Pawar Allegation
Sharad Pawar On Ajit Pawar AllegationSaam Tv
Published On

>> नितीन पाटणकर

Sharad Pawar On Ajit Pawar Allegation :

''भाजप विरोधात आम्ही निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात भुमिका घेतली. त्यांच्याबरोबर जाणे ही लोकांची फसवणूक ठरली असती', असं म्हणत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आरोपाला उत्तर दिलं अहे. शिवसेनेसोबत जाण्याची आमची भूमिका होती, असं ते म्हणाले आहेत.

शरद पवार म्हणाले की, ''शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र बैठक घेऊन सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. आज जे बोलत आहेत, ते त्यावेळी निर्णय प्रक्रियेत होते आणि मंत्रीमंडळात सहभागी झाले.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar On Ajit Pawar Allegation
Maharashtra Politics : 'संजय राऊत यांना शिवसेनाप्रमुख व्हायचंय', मंत्री दादाजी भुसे यांचा दावा

याआधी अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी संबंधित गोप्यस्फोट करत म्हटलं होत की, ''तुम्ही सरकारमध्ये सामील व्हा. भाजपसोबत जा मी राजीनामा देतो, असं शरद पवार यांनीच म्हटलं होतं.'' यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांचे आरोप आजच कळाले. (Latest Marathi News)

प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला होता की, शरद पवार पहिल्यांदा २००४ मध्ये भाजप सोबत जाणर होते. प्रमोद महाजन आणि आम्ही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली. दिल्लीत माझ्या घरी ही बैठक झाली. यावरच बोलताना पवार म्हणाले आहे की, ''२००४ मध्ये भाजप बरोबर जाण्याची भुमिका प्रफुल्ल पटेल यांची होती. त्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना सांगितले, तुम्हाला जायचे आहे तर जा.''

Sharad Pawar On Ajit Pawar Allegation
Maratha Reservation : '...तोपर्यंत जरांगे पाटील यांनी थांबलं पाहिजे', मराठा आरक्षणावरून मंत्री विखे पाटलांनी दिला महत्त्वाचा सल्ला

शरद पवार म्हणाले की, ''त्यानंतर २००४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला. भाजपचे सरकार ही आले नाही. तरीही पराभव झालेल्या पटेलांना केंद्रात मंत्रीपद दिले.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com