Sharad pawar Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शरद पवारांचं ठरलं! विधानसभेसाठी १०० जागांची तयारी; पदाधिकाऱ्यांना दिले महत्वाचे आदेश, गणेशोत्सवानंतर...

Sharad Pawar Group Preparation For Contest 90 to 100 seats : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने देखील तयारी सुरू केलीय. पक्षातील पदाधिकाऱ्यांची झूम मीटिंग झाल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रणधुमाळी रंगणार, हे नक्की आहे. दरम्यान राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ९० ते १०० जागांवर तयारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट ९० ते १०० जागा लढवणार असल्याचा अंदाज आहे.

शरद पवार गटाची १०० जागांसाठी चाचपणी

विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा देखील सुरु झालीय. राष्ट्रवादी शरद पवार गटाने नेमलेल्या निरीक्षकांची नुकतीच झूम मीटिंग (Assembly Election) झाली. या मीटिंगमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या सुचना पक्षातील पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत.

पदाधिकाऱ्यांची झूम मीटिंग

शरद पवार गटाची प्राथमिक स्तरावर तयारी असावी, म्हणून १०० च्या जवळपास तयारी सुरु आहे. गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा (Sharad Pawar Group) करा . बूथ कमिटी तयार करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय. गणपती उत्सवांनंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याचं समोर आलंय.

महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा

यंदा विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होतील, अशी शक्यता (Vidhan Sabha election) आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. त्यामुळे काँग्रेस देखील जास्त जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे ठाकरे गट देखील अधिकच्या जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर शरद पवार गटाने १०० जागांसाठी तयारी सुरू (Maharashtra Politics) केलीय. परंतु अद्याप महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाहीये. त्यामुळे कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT