Sameer khan Death :  Saam tv
मुंबई/पुणे

Sameer khan Death : नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता भीषण अपघात

nawab malik son in law sameer khan Death : माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या जावयाचं निधन झालं आहे. समीर खान यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी समीर खान यांचा अपघात झाला होता. समीर खान यांच्या निधनाने खान आणि मलिक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

समीर खान यांचा कुर्ला येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. समीर खान यांचं रविवारी निधन झाल्याची माहिती स्वत: माजी मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली. त्यांच्या निधनाने मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे नवाब मलिक यांनी पुढील काही दिवसांचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

समीर खान हे मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालायून नियमित तपासणी करून घरी परतत होते. समीर खान हे कारमध्ये बसत होते. त्याचवेळी कारच्या चालकाने अॅक्सिलेटर दाबला. त्यामुळे समीर खान हे कारसोबत फरफटत गेले. त्यांची कार थेट समोर भिंतीला आदळली.

तसेच कार ही चार ते पाच दुचाकींनाही धडकली. या घटनेत त्यांच्या चेहरा आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर समीर खान यांचा कार चालवणारा चालक अब्दुल अन्सारी याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं होतं.

अपघात झाल्यानंतर समीर खान यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या अपघातात निलोफर खान यांच्या हाताला देखील दुखापत झाली होती. या अपघातानंतर कारचालकाला ताब्यात घेऊन विनोबा भावे पोलिसांनी पुढील तपास सुरु केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT