Mankhurd Crime News: मुलाच्या उपचाराच्या खर्चावरून वाद टोकाला गेला; जन्मदात्याने रागाच्या भरात दीड वर्षाच्या मुलाला संपवले

Mumbai Crime News: मुंबईतील मानखुर्द परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दीड वर्षाच्या मुलाची त्याच्याच वडिलांनी हत्या केली आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam tv

मुंबईतील मानखुर्द परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दीड वर्षाच्या मुलाची त्याच्याच वडिलांनी हत्या केली आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीवुसार, इम्रान अनिस अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मुलगा आजारी असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकीना असे मुलाच्या आईचे नाव आहे. ती पती इम्रान आणि दोन मुलांसोबत मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहते. आफान असे मृत मुलाचे नाव आहे. आफान हा दीड वर्षाचा होता. त्याला किडनीचा आजार होता. त्याच्या आजारामुळे, खर्चामुळे सकिना आणि इम्रानमध्ये वाद व्हायचे. इम्रान हा दारुदेखील प्यायचा.

शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता इम्रान दारु पिऊन घरी आला. त्यावेळी त्याचे आणि सकिनाचे क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्यानंतर तो घरातून निघून गेला. तो पुन्हा साडेसात वाजता तो पुन्हा घरी आला आणि त्याने सकिनाला जेवण वाढण्यासाठी सांगितले. सकिना जेवण आणण्यासाठी किचनमध्ये गेली. त्यानंतर इम्रानने झोपलेल्या आफानला उचलून जमिनीवर आपटले. याचा आवाज येताच सकिना त्याच्या तावडीतून आफानची सुटका करते.

Mumbai Crime News
Pune Solapur Highway: शेवाळेवाडीत झाडांची कत्तल काेणी केली? तपास करा, अन्यथा आंदोलन छेडणार; आनंद स्मृती मंडळाचा इशारा

सकिना त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करते. परंतु उपचारादरम्याना आफानचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इम्रान अन्सारीला अट केली आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Mumbai Crime News
Dombivli Crime News: आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीचे भयंकर कृत्य; चार वर्षीय मुलाचे अपहरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com