Pune Solapur Highway: शेवाळेवाडीत झाडांची कत्तल काेणी केली? तपास करा, अन्यथा आंदोलन छेडणार; आनंद स्मृती मंडळाचा इशारा

आनंद स्मृती कला व क्रीडा मंडळ यांनी 2017 साली मंडळाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाची परवानगी घेऊन झाडे लावली होती. दोन ते तीन वर्ष त्यांचं संवर्धन देखील मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं.
20 trees cut at pune solapur highway
20 trees cut at pune solapur highway Saam Digital

- सागर आव्हाड

Pune :

पुणे सोलापूर महामार्गावर (pune solapur highway) शेवाळवाडी फाटा येथे वीस झाडांची कत्तल करण्यात आली आहे. एका रात्रीत मोठ्या उंचीच्या झाडांची कत्तल केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त हाेत आहे. या झांडांची कत्तल करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समाेर आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शेवाळेवाडी फाटा येथील पीएमटी डेपो समोरील राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर राष्ट्रीय महामार्गाची परवानगी घेऊन लावलेल्या एकूण वीस झाडांची कत्तल शुक्रवारी (ता. 12) करण्यात आली. ही कत्तल अज्ञात लोकांनी केल्याची माहिती मिळत आहे.

20 trees cut at pune solapur highway
Shirdi News: साईभक्‍तांसाठी आनंदाची बातमी; भाविकांसाठी बुधवारी साई मंदिर रात्रभर राहाणार खुले

आनंद स्मृती कला व क्रीडा मंडळ यांनी 2017 साली मंडळाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाची परवानगी घेऊन झाडे लावली होती. दोन ते तीन वर्ष त्यांचं संवर्धन देखील मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं. सहा वर्षात ही झाडे खूप मोठी झाली होती. रात्रीत ही झाडे तोडून टाकल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. (Maharashtra News)

आनंद स्मृती कला व क्रीडा मंडळाचे संस्थापक विक्रम शेवाळे यांनी झाडाची कत्तल कोणी केली याचा तपास करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

20 trees cut at pune solapur highway
Amravati News : झोपडपट्टी परिसरातील अनिरुद्धची शिक्षणाची आस, ब्रिटिश सरकारची दीड कोटीची फेलोशिप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com