Sameer Wankhede Navab Malik ANI/SaamTV
मुंबई/पुणे

"समीर वानखेडे हा भाजपचा म्होरक्या, तो बोगसगिरी करतो"

या बोगस केसेस आहेत त्या कोर्टात टिकणार नाहीत.

दिलीप कांबळे

मावळ : 'समीर वानखेडे (Sameer Wankhede) प्रसिद्धीसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहे. वानखेडे भाजप वाल्यांचा म्होरक्या आहे, तो बोगसगिरी करतो, त्यामुळेच या बोगस केसेस आहेत त्या कोर्टात टिकणार नाहीत. येणाऱ्या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारी तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते हे आम्हाला समजलं आहे.' असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडेंवरती केली आहे. (Nawab Malik allegations against Sameer Wankhede)

हे देखील पहा -

मावळ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिरासाठी ते मावळ मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दहशत निर्माण करण्यासाठी सध्या नेत्यांच्या चौकशी करत असून केंद्र सरकार Central Goverment ही बोगसगिरी सुरु आहे. केवळ भीती निर्माण करुन बदनामी करण्यासाठी अजित पवारांच्या Ajit Pawar बहिणींच्या घरी आयकर विभागाने कारवाई केली. आठ आठ दिवस नेत्याच्या नातेवाईकांच्या घरी कारवाई ही लोकांना घाबरवण्यासाठी केली जाते. महाविकास आघडीचे नेते कार्यकर्ते याला घाबरणार नाहीत असं देखील ते म्हणाले.

Edited by - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT