Navratri Utsav 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Navratri Utsav 2023: 'नवरात्रीत पटेल समाजाशिवाय प्रवेश नाही...' नवी मुंबईतील फलकानंतर मनसे आक्रमक

MNS News: आयोजकांची भेट घेऊन त्यांच्याकडून झालेली चूक त्यांच्या लक्षात आणून दिली.

Ruchika Jadhav

Navi Mumbai News:

राज्यात मराठी आणि गुजराती वाद अद्यापही शांत झालेला नाहीये. नवी मुंबईच्या कामोठे येथे नवरात्रीत निमित्त आयोजित कार्यक्रमात पटेल समाजाशिवाय इतरांना प्रवेश नाकारण्यात आलाय. पटेल समाजाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश नसल्याचे फलक पाहून मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा हाती घेतलाय. (Latest Marathi News)

मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आवाज उठवत आयोजकांची भेट घेतली. आयोजकांची भेट घेऊन त्यांच्याकडून झालेली चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून आयोजकांनी देखील तातडीने आपला फलक हटवून सर्वांना परवानगी असल्याचा फलक लावला जाणार असल्याचं म्हटलं. तसेच सर्वांची मफीही मागितली.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांचे प्रकरण चांगलेच चिघळले होते. मुलुंडच्या एका सोसायटीत गाळा भाड्याने घेण्यासाठी गेले असता त्यांना तेथील व्यक्तींनी मराठी माणसांना गाळा दिला जाणार नाही असं म्हटल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत गुजराती पिता- पुत्राला माफी मागायला लावली होती. त्यानंतर मनसेने संतप्त प्रतिक्रिया देत राज ठाकरेंनी काढलेलं एक जुनं व्यंगचित्र शेअर केलं होतं.

राज्यात सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना मराठी आणि गुजराती वाद काही ठिकाणी होताना दिसतो आहे. मात्र इथेही मनसेने स्वत: उपस्थित राहून वाद मिटवलाय. तसेच आयोजकांना समज दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT