Pune Crime News: गणवेश न घालता कोर्टात जाणं पडलं महागात; भूषण पाटीलवरील सुनावणीदरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्तांना नोटीस

Bhushan Patil News: कोर्टात येताना गणवेश का परिधान केले नाही याचे उत्तर पुढच्या १५ दिवसात द्या,अशा शब्दांत कोर्टाने दिली सहायक पोलीस आयुक्तांना नोटीसही बजावलीये.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

Pune:

पुणे अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटकेत असलेल्या भूषण पाटीलवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना फटकारलं आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे सत्रन्यायालयात गणवेश न घालता आले होते. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Pune Crime News
Crime News: नवी मुंबईतील हॉटेलमध्ये राडा; हॉटेल चालकाकडून खंडणीची मागणी

भूषण पाटील प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आज सुनावणीवेळी कोर्टात उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलीस गणवेश परिधान न करता साधा गणवेश परिधान केला होता. त्यामुळे कोर्टाने त्यांना फटकारलं.

तुम्ही जबाबदार पदावर आहात तुम्हाला हे वागणं शोभत नाही, असं कोर्टाने पोलिसांना ऐकवलं आहे. कोर्टात येताना गणवेश का परिधान केला नाही, याचं उत्तर पुढच्या १५ दिवसात द्या,अशा शब्दांत कोर्टाने सहायक पोलीस आयुक्तांना नोटीसही बजावलीये.

ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पलायन केल्यावर ११ ऑक्टोबर रोजी त्याचा भाऊ भूषण पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी पुढे त्याचा मित्र अभिषेक बलकवडेलाही अटक केली. त्यानंतर दोघांनाही सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायाधीश बिराजदार यांनी त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी पार पडलीये.

आज पार पडलेल्या सुनावणीत भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ झालीये. २० तारखेपर्यंत भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलीये. भूषण पाटीलच्या घरून ८ पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्स प्रकरणात आणखी ६ आरोपींची नावे निश्चित करण्यात आलीत.

Pune Crime News
Pune Crime: फुकट दारुसाठी दादागिरी, मद्यधुंद एक्साइज अधिकाऱ्याकडून हॉटेल मॅनेजरसह वेटरला मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com