देहु मधील कुंभारवाडयात नवरात्रौत्सवाची लगबग; ७ ऑक्टोबरला होणार घटस्थापना दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

देहु मधील कुंभारवाडयात नवरात्रौत्सवाची लगबग; ७ ऑक्टोबरला होणार घटस्थापना

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रौत्सवासाठी दुर्गामातेच्या मूर्ती तयार करण्याची लगबग सध्या मावळमधील कुंभारवाड्यात सुरू झाली आहे.

दिलीप कांबळे

मावळ: अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रौत्सवासाठी दुर्गामातेच्या मूर्ती तयार करण्याची लगबग सध्या मावळमधील कुंभारवाड्यात सुरू झाली आहे. यंदा महाकाली, सिंहावर आरुढ आणि बंगाली पद्धतीच्या दुर्गामूर्ती घडविण्याचे काम देहु मधील कुंभार वाडयात तसेच मावळ मधील अनेक  ठिकाणी सुरू आहे. मात्र सध्या पडत असलेल्या पावसामुळे मूर्ती सुकविण्याचे मोठे संकट सध्या मूर्तीकारांवर आहे. त्यामुळे हीटर, कोळसे आणि लाकडे जाळून मूर्ती सुकविण्याची कसरत मूर्तीकारांना करावी लागत आहे. (Navratri festival at Kumbharwada in Dehu; The Ghatsthapana will take place on October 7)

हे देखील पहा -

शहरातील विविध भागात नवरात्रौत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे. सात ऑक्टोबर रोजी घटस्थापना असल्यामुळे मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सद्यस्थितीत साच्यातून तयार मूर्ती बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यावर तणस आणि मातीचा लेप चढवून मूर्तीला प्राथमिक रुप देण्यात कलावंत गुंतले आहेत. तर काही ठिकाणी मूर्तीसाठी मिश्रण तयार करण्यापासून ओतीव काम, साच्यातील मूर्तीला पॉलिश करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.

आदिशक्ती माता दुर्गेच्या उपासनेचे पर्व म्हणून नवरात्रौत्सव सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्दीदात्री अशा देवीच्या नऊ रूपांची आराधना नऊ दिवस केली जाते. मात्र कोरोनामुळे अनेक बंधने यावर्षी देखील नवरात्र उत्सवासाठी आहेत. मूर्तीची उंची त्याचप्रमाणे उत्सव साजरा करण्यावर बंधने असल्याने मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनी देखील कमी मुर्त्या घडवल्या आहेत. केवळ एक ते चार फुटांच्या मुर्त्या यावर्षी बनविण्यात आल्या आहेत.

यावर्षी सर्वात जास्त मागणी ही आंबाबाई आणि सप्तश्रृंगी मातेच्या चार फुटांच्या मूर्त्यांना आहे. देहु परिसरातील कुंभार वाडयात दुर्गामातेच्या एक ते चार फूट उंचीच्या मूर्ती तयार आहेत. सध्या कुंभार वाडयामध्ये मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती घडविल्या जात आहेत. परंतु कच्चा माल महाग झाल्याने मूर्त्यांच्या किंमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT