सचिन गाड, प्रतिनिधी
आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे नवरात्रोत्सवाचा उत्साह असतानाच मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फाल्गुनी पाठकच्या दांडियाचे आमिष दाखवून १५६ जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
नवरात्रोत्सव काळात फाल्गुनी पाठक हे नाव चांगलेच चर्चेत येते. गरबा क्विन अशी फाल्गुनी पाठकची ओळख असून तिच्या कार्यक्रमांना या काळात मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र बोरिवलीमधील काही जणांना फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाचे पास मिळवणे चांगलेच महागात पडले आहे.
बोरिवली (पश्चिम) मध्ये राहणारा विशाल शाह या तरुणाने फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा केला होता. तसेच विशाल शाह स्वस्तात फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमांचे पासेस देत असत्याची माहिती कांदिवलीतील एका तरूणाला मिळाली.
या कार्यक्रमाचा पास ४,५०० रुपयांऐवजी ३,३०० रुपयांना मिळणार असल्याचे या तरुणांना सांगण्यात आले . त्यामुळे तक्रारदार तक्रारदारासह १५६ जण पास खरेदी करण्यास तयार झाले. ठरल्यानुसार सर्वांनी रक्कम देऊ केली. मात्र त्यानंतर शाहने मोबाईल बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.