Navi Mumbai Vashi Fire Update : दिवाळीच्या सणावर विरजण पडले आहे. नवी मुंबईमधील वाशीमध्ये आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाशीमधील सेक्टर 14 येथील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगच्या 10व्या मजल्यावर मध्यरात्री आगीचा भडका उडाला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, पण या दुर्दैवी घटनेत संसाराची राखरांगोळी झाली. चार जणांच्या मृत्यूने वाशीवर शोककळा पसरली आहे.
मध्यरात्री रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगमधील इमारतीला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटानस्थळी दाखल झाले. इमारतीमधी लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. पण आगीवर नियंत्रण मिळाले पण या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या घटनेची नोंद करण्यात आली असून तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रहेजा रेसिडेन्सीच्या इमारतीत आग लागल्यानंतर ज्वाळा अन् धुराचे लोट दूरपर्यंत पसरले होते. या आगीत मृत्यू झालेल्या चार जणांबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला चार ते पाच तास लागले.त्यानंतर कुलिंगचे काम करण्यात आले. आगीमध्ये गंभीर जखमी झालेल्या चार ते पाच जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू होते, पण प्रकृती चिंताजनक होती. जखमींमधील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी बेसिलियम टॉवर या इमारतीच्या 31 व्या मजल्यावरील गॅलरी मध्ये ठेवण्यात आलेला लाकडी सोफा आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तर वागळे इस्टेट येथे ऐका गॅरेजला आग लगली होती. शिळफाटा या ठिकाणी ऐका मंडप डेकोरेशनच्या दुकानाला आग लागली होती. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.