नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये बसचा अपघात
एनएमएमटी बसने सहाजणांना उडवले
बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
Navi Mumbai Turbhe Accident : नवी मुंबईमध्ये एनएमएमटीच्या बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या बसने पादचाऱ्यांना जोरात धडक मारली. या अपघातात ६ जण दुखापतग्रस्त झाले. जखमींना उपचार करण्यासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले
पीटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भे नाका परिसरात एनएमएमटी इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला. यात सहाजणांनी दुखापत झाली. पण सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी इलेक्ट्रिक बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गरजेपेक्षा जास्त वेगाने बस चालवत असताना बसवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
बस वेगाने चालवली जात होती. फायझर कंपनी रोड स्ट्रीचजवळ बसचालकाचे बसवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातग्रस्त बस ही एनएमएमटीच्या तुर्भे डेपोमधील आहे. इलेक्ट्रिक बस जप्त करण्यात आली असून फॉरेन्सिक आणि अन्य तपासणी सुरु आहे, अशी माहिती तुर्भे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश जगताप यांनी दिली आहे.
अपघातप्रकरणामध्ये इलेक्ट्रिक बसचा चालक प्रमोद कनोजिया याच्या विरोधात कलम २८०, १२४ (अ), भारतीय न्याय संहिता आणि अन्य कायद्यांच्या अंतर्गत तरतुदींच्या अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (३१ जुलै) रात्री नऊच्या सुमारास घडल्याची माहिती पीटीआयला तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आचासाहेब पाटील यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.