Navi Mumbai Water Supply, Navi Mumbai News saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : नवी मुंबईत 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Navi Mumbai Water Cut News: तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Water Cut News: नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा (navi mumbai water supply department) करणाऱ्या चिखले येथील पनवेल कर्जत येथील दुहेरी रेल्वे मार्गाकरीता जलवाहिनी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. तसेच कळंबोली येथे एक्सप्रेस पुलाखाली दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील लाईन क्रॉसिंग करून जलवाहिनी टाकण्यासाठीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. (Breaking Marathi News)

याबराेबरच भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा या मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी सोमवारी सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT