Senior police inspector Satish Kadam, caught red-handed taking ₹4 lakh bribe, now booked for amassing ₹3.48 crore in illegal wealth. ACB has registered a case under the Prevention of Corruption Act. Saam TV News
मुंबई/पुणे

Navi Mumbai : लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले, ११ वर्षांत २९७ टक्के संपत्ती वाढली

Corrupted Police Officer : वरिष्ठ पोलीस निरीक्षककाकडे उत्पन्नापेक्षा तब्बल 297 टक्के अधिक मालमत्ता आढळली. ११ वर्षात गैरमार्गाने साडेतीन कोटीपेक्षा अधिकची संपत्ती जमा केल्याचं उघड झाले.

Namdeo Kumbhar

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Navi Mumbai Corrupted Police Officer : बांधकाम व्यावसायिकाकडून 4 लाख रुपयांची लाच घेताना गत सफ्टेंबर महिन्यात रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याने त्याच्या एकूण उत्पन्नापेक्षा तब्बल 297 टक्के अधिक संपत्ती संपादित केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. त्यानुसार मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश कदम याच्या विरोधात उलवे पोलीस ठाण्यात अपसंपदा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

एनआरआय पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याला गत सफ्टेंबर महिन्यामध्ये महेश कुंभार या बांधकाम व्यावसायिकाकडून 4 लाख रुपयांची लाच स्विकारताना मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उलवे येथून अटक केली होती. त्यावेळी एसीबीच्या पथकाने उलवे येथील त्याच्या फ्लॅट मधून मोठी रक्कम देखील जप्त केली होती. प्राथमिक तपासात स‍तीश कदम याने गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचे आढळून आल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहसंचालकाकडून त्याच्या संपत्तीची उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार पोलीस दलात दाखल झाल्यापासून स‍तीश कदम याने अत्तापर्यंतच्या कालावधीत (1 डिसेंबर 2013 ते 9 ऑक्टोबर 2024) जमवलेल्या संपत्तीची तपासणी एसीबीच्या मुंबई युनिटचे पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले व त्यांच्या पथकाने तपासणी केली. सहा महिने सुरू असलेल्या या तपासणीत सतीश कदम याने त्याच्या उत्पन्नापेक्षा तब्बल 3 कोटी 48 लाख 40 हजार इतकी (297 टक्के) अपसंपदा केल्याचे आढळून आले आहे.

यावरुन तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याने नोकरीच्या कालावधीत पदाचा, अधिकाराचा गैरवापर करुन स्वत:च्या आणि कुटुंबाच्या नावावर गैरमार्गाने सदरची संपत्ती कमावल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार एसीबीच्या मुंबई युनिटने सोमवारी उलवे पोलीस ठाण्यात स‍तीश कदम याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 13(1)(ब) सह 13(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

Tuesday Horoscope : नागदेवतेची कृपा होणार; अचानक धनयोग येणार; ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

SCROLL FOR NEXT