नवी मुंबईच्या मॉलमध्ये उंदीरांचा सुळसुळाट
आईस्क्रीमच्या दुकानात आढळले उंदीर
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप
Video : नवी मुंबईमधून एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईच्या सीवूड्समधील एका मॉलमधील आईस्क्रीमच्या दुकानामध्ये उंदीरांचा सुळसुळाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. दुकानात उंदीर मुक्तपणे संचार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दुकानातील आईस्क्रीमच्या मशिनवर उंदीर फिरत असल्याचे पाहायला मिळते. दुकानाच्या टेबलावर आईस्क्रीमचा कोन ठेवलेला आहे. टबवर चढून एक उंदीर आईस्क्रीमचा कोन चावत असल्याचे दिसते. नवी मुंबईतील प्रसिद्ध मॉलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दुकानावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.
न्यूडल्सच्या पाकीटात मेलेली पाल
एका तरुणालाला न्यूडल्सच्या पाकीटामध्ये मेलेली पाल आढळून आली. या प्रकरणी तरुणाने अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली आहे. पालीचे मेलेले पिल्लू असलेले न्यूडल्सचे पाकीट तरुणाने प्रशासनाच्या स्वाधीन केले. ही घटना अहिल्यानगर शहरात घडल्याची माहिती समोर आली आहे.
निलेश दिवे या तरुणाने अहिल्यानगर शहरामधील डीमार्टमधून न्यूडल्सची दोन पाकीटे खरेदी केली होती. यातील निलेशला एका न्यूडल्सच्या पाकीटात काळपट पदार्थ आढळला. हा काळपट पदार्थ काय आहे हे पाहण्यासाठी पाकिटातील न्यूडल्स एका ताटात टाकले, तेव्हा काळपट पदार्थ हे पालीचे मेलेले पिल्लू आहे हे निलेशच्या लक्षात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.