Police Death  saam tv
मुंबई/पुणे

Police Death : नवी मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नीशी वादानंतर घरात आयुष्य संपवलं

Police Death News : उलवे येथील राहणाऱ्या एका पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. हे पोलीस शिपाई नवी मुंबईतील सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते.

Yash Shirke

  • नवी मुंबईत सानपाडा पोलीस स्टेशनच्या शिपायाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

  • स्वप्निल लोहार यांनी पत्नीशी वादानंतर हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

  • पोलीस शिपाईने आत्महत्या केल्याची नोंद उलवे पोलीस ठाण्यात झाली असून तपास सुरु आहे.

विकास मिरगणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Navi Mumbai : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील सानपाडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उलवे येथे राहणाऱ्या एका पोलीस शिपायाने घरात गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपवले. घरी झालेल्या कौटुंबिक वादानंतर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची नोंद उलवे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी शिपाई घरी एकटाच होता.

गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव स्वप्निल लोहार असे आहे. ते उलवे येथील रहिवासी होते. नवी मुंबईमधील सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये लोहार कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर स्वप्निल लोहार यांनी आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेच्या वेळी स्वप्निल लोहार हे घरी एकटे होते. लोहार यांचे त्यांच्या पत्नीसोबत फोनवर बोलणे झाले. फोनवर बोलत असताना त्या दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले जात आहे. या प्रकरणी उलवे पोलीस स्थानकामध्ये नोंद करण्यात आली आहे. तसेच तपास देखील सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

SCROLL FOR NEXT