नवी मुंबईच्या सानपाड्यात एका परदेशी तरूणाचा इमारतीवरून पडून दुर्देवी मृत्यू झाला. हा तरूण इंडोनेशियातील रहिवासी असून, मित्राच्या लग्न समारंभासाठी नवी मुंबईत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा शनिवारी वाशी येथील रघुलीला मॉलमध्ये पार पडला. या लग्नसोहळ्याला Allde Edvard Jan या तरूणानं हजेरी लावली होती. मात्र, नंतर दुसऱ्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दुर्देवी मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे Allde Edvard Jan हा तरूण वास्तव्यास आहे. तो लग्न सोहळ्यानंतर काही मित्रांसोबत बाहेर गेला होता. मात्र, नंतर तो बेपत्ता झाला असल्याची माहिती आहे.
रविवारी सायंकाळी त्याच्या मित्राला Allde Edvard Jan गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली होती. नंतर परदेशी तरूणाला तातडीने सायन येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर मित्र प्रणय शाह याने सानपाडा पोलीस ठाण्यात या घटनेबाबत माहिती दिली', असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
'Allde Edvard Jan हा लग्न सोहळ्यानंतर अबोट हॉटेलमध्ये जात होता. मात्र, रस्ता चुकला आणि तो थेट सानपाडा सेक्टर - १ मधील साईराज सोसायटीत जाऊन पोहोचला. त्याने आधी इमारतीच्या गेटवरून उडी मारली. नंतर तो थेट चौथ्या मजल्यावर गेला. त्याला आपण चुकीच्या ठिकाणी आलो असल्याची जाणीव झाली'.
'त्यानं जिना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे बाल्कनीत स्वत:वरचे संतुलन सुटले. तो थेट खाली कोसळला. आम्हाला संशय आहे की, तो दारूच्या नशेत असावा. शवविच्छेदन अद्याप झालेला नाही. रिपोर्ट समोर आल्यानंतर सत्य उघड होईल', अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
Allde Edvard Jan यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यासाठी, नवी मुंबई पोलीस अधिकृत माध्यमांद्वारे स्वीडिश दूतावासाशी संपर्कात आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, या घटनेनंतर अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.