Vashi Massage Centre Raided Saam Tv News
मुंबई/पुणे

मसाज पार्लरच्या आड सेxxx रॅकेट; तरूणींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकललं, नवी मुंबईत ६ युवतींची सुटका

Vashi Massage Centre Raided: नवी मुंबईच्या वाशी सेक्टर १७ मध्ये मसाज पार्लरच्या आड वेश्याव्यवसाय. पोलिसांनी छापा टाकून सहा युवतींची सुटका केली.

Bhagyashree Kamble

नवी मुंबईत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच वाशी येथील घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून देहव्यापाराचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी या ठिकाणाहून सहा युवतींची सुटका केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वाशी येथील सेक्टर १७ मधील एका मसाज पार्लरमध्ये अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. गुप्त माहितीच्या आधारे वाशी पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मसाज पार्लरवर छापा टाकण्याचा प्लान रचला. वाशी पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकला.

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं उघड झालं. वाशी पोलिसांनी छापा टाकून देहव्यापाराचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या ठिकाणाहून सहा युवतींची सुखरूप सुटका केली. तसेच तरूणींना सुरक्षित ठिकाणी हलवलं. मिळालेल्या माहितीनुसार, या युवतींना जबरदस्तीने देहव्यापाराच्या दलदलीत ढकलण्यात येत होतं.

या प्रकरणात पार्लरची संचालिका आसिमा रॉबिन घोष (वय वर्ष ३४) हिला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. तर, तिचा साथीदार नूर आलम शेख फरार असून, त्याच्या शोधासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मसाज पार्लरच्या नावाखाली तरूणींना बोलावत होता. तसेच त्यांच्याकडून जबरदस्तीने देहव्यापार करवून घेत होता. दरम्यान, संबंधित मसाज सेंटरला पोलिसांनी सील केले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT