Navi Mumbai CIDCO Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Lottery 2024: सिडकोचा दसरा धमाका, 40,000 घरांसाठी लॉटरी? या शहरांत उभी राहणार घरे!

Navi Mumbai CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. लवकरच सिडकोच्या ४० हजार घरांची लॉटरी निघणार आहे.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबई हक्काचे घर असावे असं स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर लॉटरी निघणार आहे. नवी मुंबईतील विविध नोडमध्ये तसेच रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या तब्बल ४० हजार घरांची लॉटरी निघणार आहे. वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या स्थानकांजवळ ही घरं असणार आहे. त्यामुळे सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असणार आहे.

सिडकोने नवी मुंबईतील विविध ठिकाणी आणि रेल्वे स्टेशनजवळ तब्बल ४० हजार घरांची निर्मिती केली आहे. दसऱ्यामध्ये या घरांसाठी लॉटरी निघणार आहे. घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे. या लॉटरीमध्ये ग्राहकांना कोणत्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाचे घर पाहिजे हे निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. सिडकोच्या घरांच्या या लॉटरीला ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सिडकोची ही सर्वात मोठी लॉटरी असणार आहे. त्यामुळे ज्यांना आतापर्यंत अर्ज करूनही सिडकोमध्ये घरं मिळाली नाहीत त्यासाठी यंदाची ही जास्त घरांची लॉटरी फायदेशीर ठरू शकते. या लॉटरीमध्ये त्यांना घर मिळू शकते. वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या रेल्वे स्थानकांजवळ ही घरं असणार आहेत. त्यामुळे या लॉटरीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

Tuesday Horoscope : प्रेम, पैसा आणि यश मिळणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू

धनूभाऊंनी दिली जरांगेंची सुपारी? जरांगेंच्या घातपातासाठी अडीच कोटींची डील?

SCROLL FOR NEXT