Belapur Building Collapsed Video: Saam Tv
मुंबई/पुणे

Belapur Building Collapsed: बेलापूरमध्ये ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO पाहा

Belapur Building Collapsed Video: बेलापूर इमारत दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना घडत असताना एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

Priya More

नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये (Belapur) ४ मजली इमारत कोसळल्याची घटना शनिवारी घडली होती. या दुर्घटनेमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही इमारत कोसळतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इमारत दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना घडत असताना एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

बेलापूरच्या सेक्टर १९ मध्ये असलेल्या शहाबाज गावामध्ये ही इमारत कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेचा जो व्हिडीओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे त्यामुळे दिसत आहे की, इमारत कोसळत असताना नागरिकांचा किंचाळण्याचा आवज येत आहे. सर्वजण इकडे तिकडे पळताना दिसत आहेत. अक्षरश: पत्त्यांसारखी ही इमारत कोसळल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

शनिवारी पहाटे ४ वाजता ही इमारत कोसळली होती. ही इमारत चार मजली होती. पण पूर्वी ही इमारत ३ मजल्याची होती. त्यानंतर मालकाने तिसऱ्या मजल्यावर ४ था मजला बांधला होता. त्यामुळे संपूर्ण इमारतीवर चौथ्या मजल्याचा अतिभार आल्यामुळेच ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी बेलापूर पोलिसांनी जागा मालक आणि विकासकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. तपास अंतिम टप्प्यात पोहचला असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण ५२ जणांना वाचवण्यात यश आले होते. पण ३ जणांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, या इमारतीच्या खाली असणाऱ्या एका सलून चालकाला इमारतीत कंपण होत असल्याचे जाणवले. त्याने तातडीने आरडाओरडा केला त्यामुळे इमारतीमध्ये राहणारे इतर सर्वजण पळत बाहेर आले. तर इतरांना तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आले. पण ३ जणांना बाहेर पडता आले नाही. हे तिघेही इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांचा मृत्यू झाला. नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT