Pandavkada Waterfall News Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: खारघरजवळील पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या १३ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pandavkada Waterfall News: नवी मुंबईतील खारघरजवळील पांडवकडा धबधब्यावर वर्षासहलीसाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. त्याचा मृतदेह रविवारी सापडला.

पावसाळ्यात धबधब्यांवर वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक जात असतात. मात्र, अनेक ठिकाणी अपघाती मृत्यूच्या घटना घडतात. त्यामुळे यंदा पोलीस प्रशासनानं खबरदारी म्हणून काही धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घातली होती.

नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यावरही पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, तरीही अनेक पर्यटक धबधब्यावर जातात. अशातच या धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

पांडवकडा धबधब्यावर शनिवारी १३ वर्षीय हर्ष गौतम हा मुलगा मित्रांसोबत पर्यटनासाठी गेला होता. त्याचा पाय घसरला. तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती खारघर पोलिसांनी दिली. हर्ष हा खारघर येथे राहत होता.

'हर्ष पाय घसरून पडल्यावर त्याच्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या मित्राचा पायही घसरला. परंतु तो सुखरुपपणे बाहेर आला', असेही पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी अवघ्या ५ मिनिटांतच घटनास्थळी पोहचले. परंतु मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या.

'शोध घेऊनही सूर्यास्तापर्यंत मुलाचा मृतदेह सापडला नाही. रविवारी सकाळी तो मुलगा ज्या ठिकाणाहून पडला होता. त्या ठिकाणाहून ५० मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रवीण बोडके यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT