Navi Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai: शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला आग; दैव बलवत्तर म्हणून...

खारघर सेक्टर 15 येथील घरकुल सोसायटीजवळ ही स्कूल बस आली असता अचानक या बसमधून धुराचे लोट येऊ लागले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे -

नवी मुंबई: शाळकरी मुलांना घेऊन जात असताना एका स्कूल बसला (School Bus) आग लागल्याची घटना समोर आली आहे. खारघरमधील सेक्टर 15 येथील घरकुल सोसायटीजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत स्कूल बस जळून खाक झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना वेळीच उतरवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघर (Kharghar) येथील पीपल एज्युकेशन संस्थेच्या स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जातं होती. खारघर सेक्टर 15 येथील घरकुल सोसायटीजवळ ही स्कूल बस आली असता अचानक या बसमधून धुराचे लोट येऊ लागले. बस चालकाने प्रसंगावधान साधत बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं.

पाहा व्हिडीओ -

त्यानंतर खारघर अग्निशमन दलाला (Kharghar Fire Brigade) घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. मात्र, अचानक लागलेल्या या आगीत स्कूल बसचे मोठे नुकसान झाले असून बस चालकाच्या प्रसंगावधानाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS अधिकाऱ्यांचे काम काय असते?

Shocking Crime: बड्या व्यापाऱ्याला घेरलं अन् १०-१२ गोळ्या झाडल्या; लॉरेन्स गँगनं घेतली हत्येची जबाबदारी

Maharashtra Live News Update : नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू

Dry Clothes Without Sun : उन्हाशिवाय कपडे कसे वाळवायचे?

Sindhudurg : मालवण समुद्रात मासेमारी नौका बुडाली; एक मच्छीमार बेपत्ता, दोघे बचावले

SCROLL FOR NEXT