Kobra Snake In Boot Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: सुरक्षा रक्षकाच्या बुटातून निघाला कोब्रा, फणा काढून बाहेर आला अन्...; पाहा खतरनाक VIDEO

Kobra Snake In Boot: बुटामध्ये कोब्रा साप आढळून आल्यामुळे नवी मुंबईतल्या महापे एमआयडीसीमध्ये खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकाच्या बुटमध्ये हा कोब्रा लपून बसला होता. सर्पमित्राने रेस्क्यू करत या सापाला जंगलात नेऊन सोडले.

Priya More

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईमध्ये सुरक्षा रक्षकाच्या बुटातून कोब्रा साप निघाल्याची घटना समोर आली. हा कोब्रा साप बुटामध्ये लपून बसला होता. हा सुरक्षारक्षक बूट घालायला गेला तेवढ्यात त्याला बुटामध्ये काही तरी असल्याचे कळाले. त्याने सर्पमित्राला बोलावून घेतलं. या कोब्रा सापाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. सर्पमित्राने कोब्राला रेस्क्यू करून जंगलात नेऊन सोडलं.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील महापे एमआयडीसी क्षेत्रात एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या बुटात कोब्रा साप आढळला. सुरक्षा रक्षकाने बूट घालण्यासाठी घेतला. बूट घालताना त्याला आतमध्ये अचानक काही हालचाल जाणवली. त्यानंतर त्याने तात्काळ सावधगिरी बाळगत सर्पमित्राला संपर्क केला.

सर्पमित्राने त्वरित घटनास्थळी धाव घेत सावधपणे आणि कौशल्याने कोब्रा सापाचे रेस्क्यू केले. हा साप विषारी कोब्रा जातीचा होता. सुदैवाने सुरक्षा रक्षकाला कोणतीही इजा झाली नाही आणि वेळीच हस्तक्षेप झाल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हा साप नेमका कसा आणि कुठून आला याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जेव्हा सर्पमित्राने या कोब्रा सापाला रेस्क्यू करण्यासाठी कपाटा खाली असलेला बूट बाहेर काढला. तेव्हा हा कोब्रा साप फणा काढून बाहेर आला. त्यानंतर तो बुटातून बाहेर पडत पळून जाऊ लागला. सर्पमित्राने त्याला रेस्क्यू केले आणि जंगलामध्ये नेऊन सोडून दिले. पावसाळा असल्यामुळे सरपटणारे प्राणी अनेक ठिकाणी लपून बसतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहवे असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT