Dhanshri Shintre
पावसाळ्यात विशेषतः ग्रामीण आणि डोंगराळ भागात साप चावण्याच्या घटना वाढतात. अशावेळी काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घ्या.
साप चावल्यास लगेच रुग्णालय गाठणे महत्त्वाचे आहे. अँटी-वेनमचे वेळेवर उपचार विषाचा प्रभाव कमी करून जीव वाचवू शकतात.
साप चावल्यावर घरगुती उपाय, चुकीचे प्राथमिक उपचार आणि उपचारात उशीर केल्यास धोका वाढतो. त्वरित वैद्यकीय मदत घेणे अत्यावश्यक आहे.
साप चावल्यास जखम धुवू नका, घट्ट बांधू नका, बर्फ लावू नका. औषध घेणे टाळा आणि हालचाल शक्य तितकी कमी ठेवा.
साप चावल्यास घाबरू नका, शांत राहा आणि हालचाल कमी ठेवा. दागिने व घट्ट कपडे तात्काळ काढा, त्यामुळे विष पसरायला वेळ लागतो.
साप चावलेली जागा हृदयाच्या पातळीपेक्षा खाली ठेवा, रुग्णाला डावीकडे झोपवा आणि शक्य तितक्या लवकर रुग्णालयात घेऊन जा.
WHO च्या मते, दरवर्षी सुमारे ४.५ ते ५.४ दशलक्ष लोक साप चावल्याचे बळी ठरतात, यापैकी लाखोंना विषबाधा होते.