navi mumbai fire  saam tv
मुंबई/पुणे

Video : नवी मुंबईत APMC फळ मार्केटला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील वाशीजवळील एपीएमसी फळ मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Fire News : नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील वाशीजवळील एपीएमसी फळ मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे. एपीएमसी फळ मार्केटमध्ये हा अग्नीतांडव सुरू आहे.सदर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानाचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशीतील एपीएमसी फळ मार्केटला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. सदर आग एपीएमसीतील एनरोला ही आग लागली आहे. एन विभागातील सात ते आठ विंगमध्ये आग पोहोचली आहे. फळ ठेवण्यासाठी असणारे पुट्ठे जळून खाक झाले आहेत.

नवी मुंबईतील वाशीतील एपीएमसी फळ मार्केटला आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन अग्निबंब पोहोचले आहेत. अग्निशमन दलाचे जवानांचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ठाणे : नौपाड्यातील इमारतीतील घराला आग

ठाणे शहरातील नौपाडा परिसरातील इमारतीमधील एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. तळवपाळी परिसरातील धवलछाया इमारतीत आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन अग्निबंब पोहोचले आहेत. घरात अडकलेल्या वयोवृद्धाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT