Panvel Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime: बाप बनला हैवान! आधी अत्याचार, नंतर १०० रुपये देऊन केलं गप्प; पनवेल हादरलं

Panvel Crime News: बापानेच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी नराधम बापाला अटक केली. या घटनेमुळे पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधम बापाने आधी मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर १०० रुपये देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले. या घटनेमुळे पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे. पनवेल शहर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बापानेच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली. याप्रकरणी नराधम बापाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने आपल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर मुलीने गप्प राहावे आणि हे प्रकरण बापाने मुलीला १०० रुपये देऊन प्रकार कुठे सांगू नको असे सांगितले. पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला असता बाप असल्याने याबाबत कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. २ दिवसांनी पीडित मुलीला घेऊन तिच्या आईने पनवेल शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. आईच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका झांजुरणे याप्रकारणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT