Belapur Court: Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आरोपीने थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू

Belapur Court: नवी मुंबईच्या बेलापूर कोर्टामध्ये भयंकर घटना घडली. जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीने कोर्टाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.

Priya More

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईत एक खळबळजनक घटना घडली. कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीने थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत आरोपीचा जागीच मृत्यू झाला. बेलापूर कोर्टात ही खळबळ घटना घडली. शिक्षा ऐकताच आरोपीने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे कोर्टात गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर येथील कोर्टात आज दुपारी ही अत्यंत धक्कादायक घटना घडली. हत्येच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर काही वेळातच आरोपीने कोर्टाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आरोपीचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हत्येच्या गुन्ह्यातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने संबंधित आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निकाल ऐकल्यानंतर आरोपी प्रचंड मानसिक तणावाखाली गेला होता. याच तणावातून त्याने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून कोर्टा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच बेलापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पक्ष बदलणाऱ्या MLA-MP ला बसणार मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात रिजेन्सी कॉम्प्लेक्सवर महापालिकेचा हातोडा

Political News : ठाकरे सेनेत पुन्हा फूट पडणार, शिंदे गटातील आमदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Trisha Krishnan Politics: मुख्यमंत्री विजय यांच्यानंतर आता त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? जयललितांशी होतेय तुलना!

Vehicle Insurance : वाहन विम्याचे होणार ४ भाग! १५ डिसेंबरपासून नवा नियम लागू; वाहनमालकांसाठी काय बदलणार?

SCROLL FOR NEXT