Navi Mumbai Breaking News Nerul Building slab Collapse 2 People Dies 6 Injured Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai News: नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; दोघांचा जागीच मृत्यू, ६ ते ७ जण जखमी

Nerul Building slab Collapse: नवी मुंबईच्या नेरूळमधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. सारसोळे गावातील एका तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

Nerul Building slab Collapse: नवी मुंबईच्या नेरूळमधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. सारसोळे गावातील एका तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर ६ ते ७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Navi Mumbai Breaking News Nerul Building slab Collapse 2 People Dies 6 Injured)

प्राप्त माहितीनुसार, नेरुळ सेक्टर ०६ येथील (Navi Mumbai) तुलसी भवन, प्लॉट नंबर ३१३ या इमारतीची C विंगचा स्लॅब कोसळला.इमारतीच्या तीन मजल्यांचे स्लॅब थेट तळमजल्यावर आल्याने अनेक लोक जखमी झाले आहेत. या अपघातात ६ ते ७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

जखमींना तातडीने उपचारासाठी डीवाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दल, महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. दरम्यान, सतर्कता म्हणून प्रशासनाकडून इमारती शेजारील घरे खाली करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

SCROLL FOR NEXT