Navi Mumbai : Saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : नवी मुंबईत लोखंडी कमान कोसळली, पोलीस प्रशासन मदतीला धावलं

Navi Mumbai airoli Latest News : नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये ४० फूट लोखंडी कमान कोसळल्याची घटना घडली आहे. जोरदार पाऊस सुरु झाल्यानंतर भररस्त्यात ही लोखंडी कमान कोसळली. या घटनेने एकच खळबळ उडाली.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोलीमधून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ३च्या रस्त्यावरून ठाणे-बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर पावसामुळे ४० फूट कमान कोसळली आहे. या मार्गावर अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी कमान लावण्यात आली होती. नवी मुंबईतील घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे ऐरोलीत रस्त्यावर अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली लोखंडी कमान कोसळली. ऐरोलीच्या भारत बिजली येथील रेल्वे रुळागत असलेल्या अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फुटाची लोखंडी कमान कोसळली आहे. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी, वाहतूक पोलीस आणि रबाळे पोलीसांनी धाव घेतली.

ही कमान रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत आहे. यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. रस्त्यावर कोसळलेली कमान ही हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कमान हटवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.

या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. रस्त्यावर कमान कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. आता या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News : हायवेवर रील बनवताना डान्स आणि स्टंट केलात तर होणार शिक्षा? किती दंड? काय आहेत नियम? वाचा

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ८ व्या वेतन आयोगात ४० वर्षे जुना नियम बदलणार

SCROLL FOR NEXT