Navi Mumbai, Shivsena Uddhav Balasaheb Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : नवी मुंबई मनपाच्या भूखंडाची एमआयडीसीने केली विक्री; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक

या ठिकाणी खासदार निधीतून विकास करण्यात आला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai : एमआयडीसी (MIDC) प्राधिकरणाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या (Navi Mumbai Muncipal Corporation) ताब्यात दिलेल्या भूखंडाची खाजगी कंपनीला विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामळे शिवसेना (shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (uddhav balasaheb thackeray) गट आक्रमक झाला आहे. या घटनेची सखाेल चाैकशी करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष विठ्ठल माेरे यांनी केली आहे.

नवी मुंबईतील जागेला सोन्याचे भाव आल्याने एमआयडीसी प्राधिकरणाने नवी मुंबई मनपाला कोणतीही पूर्वसूचना न देता भूखंडाची विक्री केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या भूखंडावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत हायमास्ट, लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य, खासदार निधीतून ओपन जिम बसवण्यात आले आहे.

तुर्भे परिसरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे नागरिक आणि लहान मुले या भूखंडाचा वापर करतात असे असताना देखील सदर भूखंड एमआयडीसी प्राधिकरणाने खाजगी कंपनीला विकल्याने याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. (Maharashtra News)

या भूखंडावर कामाला सुरुवात करण्यात आल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या मदतीने काम थांबवत भूखंड विक्रीला विरोधात दर्शवला. या घटनेची सखोल चौकशी करुन भूखंड विक्री रद्द करण्याची मागणी करत उद्योग मंत्र्याने नको ते उद्योग करू नये असा टाेला विठ्ठल मोरे (जिल्हाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी लगावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT