Water Taxi : उद्यापासून गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेस हाेणार प्रारंभ; जाणून घ्या वेळ, तिकीट दर

मुंबईकर या सेवेस प्रतिसाद देतील असा विश्वास व्यवस्थापनाकडून व्यक्त हाेत आहे.
water taxi service from gateway of india to belapur
water taxi service from gateway of india to belapursaam tv
Published On

- सिद्धेश म्हात्रे

Gateway of India to Belapur Water Taxi Services : उद्यापासून (ता. चार फेब्रुवारी) गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर (Gateway of India to Belapur) दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेस (Water Taxi Services) प्रारंभ हाेत आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने (Mumbai Port Authority) नयनतारा शिपिंग कंपनीला (Nayantara Shipping Company) प्रवासी सेवा चालवण्यास नुकतीच मान्यता दिली आहे.

water taxi service from gateway of india to belapur
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर टँकरचा अपघात; सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतुक थांबवली

नयन इलेव्हन या वॉटर टॅक्सीमध्ये खालच्या डेकवर एकशे चाळीस प्रवासी प्रवास करू शकतात. या प्रवाशांसाठी दाेनशे पन्नास रुपये तिकीट दर आहे. तसेच बिझनेस क्लासमधून साठ प्रवासी प्रवास करू शकतात. त्यांच्यासाठी तीनशे पन्नास रुपये तिकीट दर आहे.

water taxi service from gateway of india to belapur
Satara Crime News: प्रेम प्रकरणातून युवकाचा खून

ही प्रवासी बोट सकाळी साडे आठला बेलापूर जेट्टी वरून निघेल. ती साडे नऊ वाजता गेट वे ऑफ इंडियाला पोहचेल. तसेच संध्याकाळी साडे सहा वाजता गेट वे ऑफ इंडियावरून वाॅटर टॅक्सी निघेल ती साडे सात वाजता बेलापूर जेट्टीवर पोहचेल. या वाॅटर टॅक्सी सेवेमुळे प्रवासाच्या वेळेची बचत हाेणार असल्याने मुंबईकर (passengers) यास प्रतिसाद देतील असा विश्वास व्यवस्थापनाकडून व्यक्त हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com