Navi Mumbai Preganat Women And unborn baby death case news  Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : शासकीय रुग्णालयाचा धक्कादायक कारभार, चुकीचं इंजेक्शन टोचल्याने गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप

Preganant Woman Death in Airoli : नवी मुंबईतील रुग्णालयात चुकीचे इंजेक्शन दिल्याने ८ महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे आणि त्यांच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरी गर्भवती महिला व्हेंटिलेटरवर असून उपचार सुरू आहेत.

Alisha Khedekar

  • ऐरोलीतील रुग्णालयात उपचारादरम्यान ८ महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू

  • चुकीचे इंजेक्शन किंवा औषधांचा चुकीचा डोस दिल्याचा आरोप

  • गर्भवतीच्या बाळाचाही मृत्यू झाला असून दुसऱ्या गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईतून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऐरोली येथील महापालिका रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे ८ महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याचबरोबर दुसऱ्या गर्भवती महिला रिचा मिश्रा यांची प्रकृतीही गंभीर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एक चुकीची लस दिल्याने महिलेचा मृत्यू झाला असून दुसऱ्या महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आज हॉस्पिटल बाहेर आंदोलन करण्यात आले. दरम्यान घटनेचे तीव्र पडसाद सध्या नवी मुंबईत उमटत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसूतीसाठी सोनम डोंगरे यांना ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना एक इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सोनम यांचे पती करण डोंगरे यांनी सांगितले की, इंजेक्शन दिल्यानंतर काही क्षणांतच त्या बेशुद्ध पडल्या. मात्र, रुग्णालय प्रशासनाने परिस्थिती सामान्य असल्याचे सांगत त्यांना आणि नातेवाईकांना वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला.

करण डोंगरे यांच्या म्हणण्यानुसार, पत्नीची प्रकृती गंभीर असतानाही त्यांना तब्बल तीन तास रुग्णालयाच्या आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. तसेच दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर प्रकृती अधिक बिघडल्यानंतर सोनम यांना वाशी येथील महापालिका संदर्भ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी सोनम आणि त्यांच्या गर्भातील बाळाला मृत घोषित केले. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी सोनम यांचे पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. तसेच शवविच्छेदन ऐरोलीऐवजी मुंबईतील अन्य शासकीय रुग्णालयात करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चुकीचा औषधांचा डोस दिल्यामुळे आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, दुसऱ्या गर्भवती महिला रिचा मिश्रा यांची प्रकृती चिंताजनक असून त्या व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापले आहे. शिवसेना आणि मनसेने या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: साताऱ्यात सरकारविरोधात शरद पवार गटाचे जन आक्रोश आंदोलन

Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! सोनं ३००० तर चांदींच्या दरात ८००० रुपयांनी वाढ; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sunita Ahuja: 'काश्मीरा माझ्या पायांवर पडली...'; कृष्णा अभिषेकसोबतचा वाद कसा मिटला? सुनीता आहुजांचा खुलासा

Mumbai News: मॅनहोलमध्ये 'तो' माणूस कसा पडला? १० सेकंदाचा थरारक सीसीटीव्ही VIDEO आला समोर

FAOच्या जागतिक परिषदेत बारामतीच्या ADTची दखल; AI आधारित शेती संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता

SCROLL FOR NEXT