Navi Mumbai Siddhesh Mhatre
मुंबई/पुणे

Navi Mumbai: आईने दुसऱ्या मजल्यावरून अभ्रक खाली फेकले; अन्... धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली

एका आईने आपल्या नवजात बाळाला (अर्भकाला ) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले आहे.

Ruchika Jadhav

Navi Mumbai: नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या नवजात बाळाला (अर्भकाला ) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले आहे. उलवे सेक्टर २१ मधील या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Navi Mumbai Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम संबंधातून ही घटना घडली असून प्रसूती झालेली आई ही अविवाहित होती. तरुणी आपल्या मावशीच्या घरी राहत होती. तिथेच नात्यातील एका तरुणाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. मात्र लग्न न करताच ती गर्भवती राहिली होती.

तरुणीचे पोट जास्त दिसत नसल्याने कुटुंबीयांना सदर बाब लक्षात आली नाही. अशात काल रात्री तिची प्रसूती घरातीलच शौच्छालयात झाली. कोणालाही काही कळू नये आणि आपली बदनामी होऊ नये म्हणून तिने आपले नवजात अर्भक शौच्छालयातील खिडकीतून खाली फेकून दिल्याची माहिती मिळाली आहे.

दुसऱ्या मजल्यावरून अर्भक खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी सफाई करणाऱ्या व्यक्तीला मृत अर्भक खाली पडलेले दिसले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेचा उलगडा झाला आहे. एनआरआय पोलिसांनी आईवर खुनाचा गुन्हा केला दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

SCROLL FOR NEXT